शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नेस्लेची दिवाळी भेट, आजपासून 'मॅगी' पुन्हा बाजारात

By admin | Updated: November 9, 2015 09:34 IST

'नेस्ले'ने ग्राहकांना दिवाळीची भेट देत आजपासून मॅगी बाजारात विक्रीस उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बस्स, दो मिनिटं, म्हणत लहानथोरांच्या जिभेवर रेंगाळणारी मॅगी नुडल्सची चव ग्राहकांना आजपासून पुन्हा चाखता येणार असून 'नेस्ले'ने ग्राहकांना दिवाळीची भेट देत आजपासून मॅगी बाजारात विक्रीस उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून याच महिन्यात मॅगी नुडल्स किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे नेस्ले कंपनीने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते, त्यानुसार आजपासूच बाजारात मॅगीची विक्री होणार आहे. 
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नेस्लेच्या नानजानगुड(कर्नाटक), मोगा(पंजाब) आणि बिछोलीम (गोवा) येथील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या मॅगी नुडल्सचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व चाचण्यांमध्ये मॅगी नुडल्स यशस्वी ठरली आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यानंतर आता याच महिन्यात मॅगी नुडल्स मसाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे नेस्लेने गेल्या आठवड्यात (बुधवार) म्हटले होते. 
नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त उठवली होती. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने  दिला होता. त्यानुसार या तिनही प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमून्यांची चाचणी करण्यात आली असून ती सुरक्षित आहे, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.