शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेमुळे रात्रशाळांतील शिक्षक बेरोजगार

By admin | Updated: May 30, 2016 03:51 IST

रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली

मुंबई : मुंबईसह राज्यातील रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन निर्णयातील उल्लेखाप्रमाणे रात्रशाळांसाठी वेगळे निकष लावण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही रात्रशाळांत जुन्या निकषांनुसार संचमान्यता होत असल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते म्हणाले की, जुन्या संचमान्यतेच्या निकषांमुळे अनेक रात्रशाळांतील शिक्षकांना नोकरी गमवावी लागत आहे. तरी रात्रशाळांची संचमान्यता करताना शासनाने जाहीर केलेले वेगळे निकष लावण्याची गरज मोते यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.मुंबईसह राज्यात १७६ रात्रशाळा आहेत. त्यांत शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. मात्र या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्धवेळ समजले जाते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षकाच्या वेतनश्रेणीच्या निम्मी वेतनश्रेणी दिली जाते. बहुतेक रात्रशाळांतील अनेक शिक्षक हे फक्त संबंधित रात्रशाळेतच काम करीत आहेत. परिणामी, संचमान्यतेच्या जाचक निकषांमुळे अशा अनेक अर्धवेळ शिक्षकांना नोकरी गमावून घरी बसावे लागेल, असा आरोप शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांचेही नुकसान२० नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात रात्रशाळांच्या संचमान्यतेबाबत वेगळे निकष लवकरच जाहीर केले जातील, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र दोन वर्षे उलटली तरी याबाबत वेगळे निकष जाहीर झालेले नाहीत. उलट शिक्षणाधिकारी २८ आॅगस्ट २०१५च्या नियमित शाळांच्या निकषानुसार रात्रशाळांची संचमान्यता करीत आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांना नोकरी गमवावी लागेलच, मात्र शाळा बंद झाल्यास विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. म्हणूनच शिक्षण विभागाने रात्रशाळांचे निकष जाहीर होत नाही, तोपर्यंत रात्रशाळांची संचमान्यता करू नये, अशी मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.