शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाने गाठला कळस

By admin | Updated: October 16, 2016 20:57 IST

पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर म्हणून ओळख असलेल्या अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने रविवारी कळसच गाठला

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 16 : पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर म्हणून ओळख असलेल्या अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने रविवारी कळसच गाठला.  रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये तापावर उपचार करण्यासाठी भरती असलेल्या तरुणास त्याच्या शेजारच्या खाटेवरील विष प्राशन केलेल्या रुग्णाचे इंजेक्शन व सलाईन देण्याचा प्रकार येथे रविवारी सकाळी घडला. यामुळे तापाने आजारी असलेल्या तरुणाची तब्येत बिघडल्याची तक्रार तरुणाच्या आईने केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचा दावा सर्वोपचारच्या डॉक्टरांनी केला.

 
स्थानिक इराणी झोपडपट्टी भागातील सय्यद जमीर सय्यद वजीर (२२) या तापाने फणफणलेल्या तरुणाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला शनिवारी रात्री २ वाजता सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये दाखल करण्यात आले. रात्रपाळीतील डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केल्यानंतर रविवारी सकाळपर्यंत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्यादरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाºयांनी त्याला इंजेक्शन व सलाईन दिले. त्यानंतर काही वेळातच सय्यद जमीर सय्यद वजीर याला अचानक ताप चढला व त्याला झटके येण्यास सुरुवात झाली. नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वॉर्डमध्ये कार्यरत परिचारिका व आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्यांनी मात्र या प्रकाराकडे लक्ष देण्याऐवजी कानाडोळा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यास सांगितला. सदर सामाजिक कार्यकर्त्याने सर्वोपचारमध्ये येऊन डॉक्टरांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचाºयांनी सय्यद जमीर सय्यद वजीरची तपासणी केली असता, त्याला नजरचुकीने त्याच्या शेजारच्या खाटेवर भरती असलेल्या विष प्राशन केलेल्या रुग्णाचे इंजेक्शन दिल्या गेल्याची चूक डॉक्टरांच्या लक्षात आली. (प्रतिनिधी)
 
असा झाला घोळ-
वॉर्ड क्र. ६ मध्ये सय्यद जमीर सय्यद वजीर याच्या शेजारच्या खाटेवर तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथील ज्ञानदेव काशीराम बोदडे (५०) यांच्यावर शुक्रवारपासून उपचार सुरू आहेत. दोघांची औषधे जवळजवळ ठेवण्यात आल्याने बोदडे यांचे इंजेक्शन व सलाईन सय्यद जमीर सय्यद वजीरला देण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलाची प्रकृती बिघडल्याचा आरोप त्याची आई शाहीदाबी यांनी केला आहे.
 
या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. उपचारात निष्काळजीपणा दाखविणाºया कर्मचाºयांवर योग्य कारवाई केली जाईल.
 - डॉ. अनंत डवंगे, चिकित्सा अधीक्षक, सर्वोपचार रुग्णालय, अकोला.