शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 20, 2016 02:06 IST

‘मॅनहोलची बाहेर आलेली झाकणे, खचलेले पेव्हर ब्लॉक, वाहून गेलेले गतिरोधक अशा परिस्थितीत भांडुपकरांना प्रवास करावा लागत आहे.

मुंबई : ‘मॅनहोलची बाहेर आलेली झाकणे, खचलेले पेव्हर ब्लॉक, वाहून गेलेले गतिरोधक अशा परिस्थितीत भांडुपकरांना प्रवास करावा लागत आहे. भांडुप पूर्व रेल्वे स्थानक ते दातार कॉलनी परीसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.भांडुप पूर्व येथील गणेश शंकर देवकर गुरुजी मार्गावरील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ््यात पालिकेने या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. आता पावसाळा संपला तरी येथील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शंकर देवकर गुरुजी मार्ग ते स्टेशन परीसरातील रस्ते पेव्हर ब्लॉकचे आहेत. हे पेव्हर ब्लॉक ठिकठिकाणी खचले आहेत. अनेक ठिकाणी असलेली मॅनहोलची झाकणे मुख्य रस्त्याला समांतर नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या झाकणांचा अंदाज येत नाही, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गतिरोधकांची सुद्धा दुरवस्था झाली आहे. गतिरोधक वाहून गेले आहेत. तरीही या गतिरोधकांची दुरुस्ती गेल्या चार महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी) >गणेश शंकर देवकर गुरुजी मार्ग म्हणजेच दातार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. येथील पेव्हर ब्लॉक काढण्यात आले. या पेव्हर ब्लॉकचे ढिगही रस्त्यांवर रचून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडथळा होत आहे. याप्रकाराबाबत टी वार्डच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी या याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>भांडुप पूर्वेकडील देवकर गुरुजी चौकापासून ते डी.ए.वी महाविद्यालयापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी नवख्या वाहनचालकाला येथील रस्त्यांचा अंदाज येत नाही. येथील मॅनहोलची झाकणे रस्त्याला समांतर नाही. शिवाय सतत जलवाहिन्यांवरील वॉलच्या झाकणांवरुन सतत गाड्या जातात. त्यामुळे त्यांची झाकणे सुद्धा खाली गेली आहेत.- राजू दिवटे, रिक्षाचालक>भांडुप पूर्व स्टेशनपासून ते देवकर चौकावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. येथील रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक दुरुस्तीवेळी काढण्यात येतात. पण ते पुन्हा बसवले जात नाहीत.- क्रिस्टीना डिसोजा, रहिवासीभांडुप पूर्वे स्टेशनपरीसरापासून ते दातार कॉलनीपर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गतिरोधक वाहून गेले आहेत. पावसाळ्यात डेब्रिज टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.- शुभदा दाते, रहिवासी