शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरा डावा’ आवर्तनाचा फज्जा

By admin | Updated: March 4, 2017 01:00 IST

नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यांतील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला आहे. केवळ शाखाधिकारी व बीटधारक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीवाटपाचा फज्जा उडाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे सभापती विलासराव वाघमोडे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बबनराव देवकर, विकास संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल देवकर यांनी केली आहे.पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यांतील गावांना पाणी मिळते. वितरिका ५७ वरील सातवे दारेपर्यंत पाणी गेलेच नाही. काही वेळ शेतक ऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी शाखा अधिकारी लक्ष्मणराव सुद्रिक यांनी हे दार सुरू केले.तसेच, लगेच बंद केले. या भागातील शेतकऱ्यांनी त्रागा व्यक्त केल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे चक्क लेखी आश्वासन दिले. शेतकऱ्यांना सिंचन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी आहे, असेही लेखी शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांनी दिले. मात्र, बोराटवाडी, खोरोची, रेडणी या भागात नियम मोडून पाणी शाखाधिकारी यांनी सोडले. त्यामुळे काटी, जाधववाडी, सराफवाडी, रेडा, यादववाडी परिसरातील शेकडो लाभधारक शेतकरी पाण्यासाठी पोरके राहिले.या भागात मका, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके पाण्यावाचून अखेरच्या घटका मोजत आहेत. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकारीवर्गाच्या लक्षात येत नाही. खासगी शेतकऱ्यांची शेततळी, विहिरी हे अधिकारी पैसे घेऊन भरतात. मात्र आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही? हे पाणी कोणाला विकले. कोणाची शेततळी भरली याचा जाब शेतकरी विचारणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ, मात्र पाटबंधारे विभागाच्या कामचुकारपणा करणाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा सभापती वाघमोडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक देवकर व किसन इनामे, मधुकर इनामे यांनी दिला आहे. (वार्ताहर)>शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते पाणी अर्ज करीत नाहीत. आम्ही आता वरिष्ठांना विचारणा केली. तर तेही आम्हाला पाणी अर्ज आहे का असल्यास कळवा, असे म्हणत पाणी सोडण्यासाठी अपेक्षित मागणी नाही, असे सांगतात. जर आम्ही तरीही पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न केल्यास कालव्याच्या वरील बाजूचे शेतकरी आक्रमक होतात. पाण्याचे फाटे फोडण्याचा इशारा देतात. रब्बीच्या सुरुवातीला पाणी अर्ज करा, असे प्रकटन आपण देत असतो. मात्र, त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात.- लक्ष्मणराव सुद्रिक, शाखाधिकारी