शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३७६ प्रकल्पांसाठी ८५ हजार कोटींची गरज!

By admin | Updated: May 15, 2016 05:35 IST

राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा ४५ हजार कोटींच्या वर गेलेला नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा ४५ हजार कोटींच्या वर गेलेला नाही. तरीही अजून ३७६ प्रकल्प शिल्लकच आहेत आणि त्यासाठी आणखी ८५ हजार कोटींची गरज आहे. ‘राज्यपालांचे निर्देश’ या नावाखाली समन्यायी वाटप करण्याची भूमिका घेत अनेक वर्षे बागेत पाणी शिंपडल्यासारखा निधी देत गेल्याने ही अवस्था आहे. हीच वृत्ती यापुढेही राहिल्यास आणखी २५ वर्षे यातील एकही प्रकल्प पूर्ण होणार नाही, हे वास्तव आजच्या जलसंपदा दिनानिमित्ताने समोर आले आहे.गावात एकच केशकर्तनालय असेल, तर तो एकाची अर्धी दाढी करतो, एकाची अर्धी मिशी काढतो, असे करत करत अर्ध्या गावाची दाढी कटिंग होईपर्यंत त्या पहिल्याची दाढी वाढलेली असते... याच पद्धतीने अनेक वर्षे जलसंपदा विभागाचे काम चालू आहे. मिळणाऱ्या ७ हजार कोटींतून जे प्रकल्प नव्याने सुरू झाले, त्यांनाही १० रुपये आणि जे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांनाही १० रुपयेच असे सांगायचे. परिणामी, एकही प्रकल्प पूर्ण नाही. यासाठी कठोर इच्छाशक्तीची गरज आहे. या वर्षी देवेंद्र फडणवीस सरकारने इच्छाशक्ती दाखवली व २६ प्रकल्प पूर्ण झाले. याचे श्रेय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही जाते. त्यांनी जलसंपदा विभागाला २०१५-१६साठीचा संपूर्ण निधी देऊन टाकला. गेल्या ५० वर्षांत असे कधीही घडले नव्हते. मात्र हीच भूमिका पुढच्या काळात कायम राहणार की नाही हे स्पष्ट नाही. जलसंपदा विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले, असे सांगून मध्यंतरी एआयबीपीच्या योजनांमधून मिळणाऱ्या निधीत केंद्राने आखडता हात घेतला आणि आता मोदी सरकारने १० टक्के मदत देऊ केली आहे.मोठ्या, मध्यम अशा ३७६ प्रकल्पांसाठी लागणारे ८४,४२९.४२ कोटी रुपये एका वर्षात उभे होणार नाहीत. जलसंपदा विभागाला दरवर्षी ७ हजार कोटी रुपये मिळतात. या न्यायाने ३७६ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान १२ वर्षे लागतील, दरवर्षी प्रकल्पांच्या किमती महागाईमुळे १० टक्क्यांनी वाढतात. अशा स्थितीत एकही प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही. पुढच्या १० वर्षांनीही अशाच बातम्या लिहिल्या जातील. ही राजकीय उदासीनता असून, गेल्या दोन वर्षांत (२०१४ ते २०१६) राज्याने ३४२० कोटींची मागणी केल्यावर केंद्राने ३४० कोटी म्हणजे १० टक्के रक्कम दिली आहे. याउलट २००५ ते २०१४मध्ये आघाडी सरकारने केंद्राकडे १७२८५ कोटींची मागणी केली; आणि केंद्राने १०२१६ कोटी म्हणजे मागणीच्या ६० टक्के रक्कम दिली होती. मध्यंतरी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही आकडेवारी पाहून चक्रावून गेले. एवढे कमी पैसे मिळणार असतील, तर राज्यातील धरणे पूर्ण कशी होतील, असा सवाल त्यांनी उमा भारतींनाच केला.