शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कांदा विक्री केंद्रांची गरज

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

दोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईदोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली. युती शासनाने त्याच धर्तीवर कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू केली तरच ग्राहकांना दिलासा मिळेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कांदा व डाळींचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. तूरडाळ १७० रुपये दर, मूगडाळ, मसुरडाळीच्या किमतीही १२० रुपयांवर गेल्या आहेत. चनाडाळ कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तिचे दर १००पर्यंत गेलेही आहेत. पहिल्यांदाच सर्व डाळींच्या किमतीने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत फळे व भाजीपाला परवडत नसणाऱ्या सामान्य नागरिकांना डाळी खरेदी करणेही परवडेनासे झाले आहे. पूर्वी रेशनिंगवर तूरडाळ उपलब्ध होत होती. परंतु तीही आता मिळत नाही. सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधात असताना महागाईविरोधात काँगे्रस आघाडी सरकारवर टीका करणारे शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस सरकारने मुंबईत तब्बल ११० स्वस्त भाजीपाला केंद्रे सुरू केली होती. तत्कालीन पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला होता. मुंबई एपीएमसीमधील भाजीपाला महासंघ, भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे, उपसचिव अविनाश पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या केंद्रांमुळे बाजारभाव कमी करण्यात आले होते. किरकोळ मार्केटमध्ये ७० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा स्वस्त भाजीपाला केंद्रांमध्ये ४० ते ५० रुपयांना उपलब्ध करून दिला होता. याच धर्तीवर आता शासनाने मुंबईसह राज्यात स्वस्त भाजी व कांदा विक्री केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. रेशनवर मिळाव्या डाळीराज्यात शहर ते गावपातळीपर्यंत सर्व ठिकाणी रेशनिंग दुकाने आहेत. महागाईपासून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेशनिंगवर स्वस्त दरात तूरडाळ, मूगडाळ, मसुरडाळ व चनाडाळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. स्वस्त विक्री केंद्रे सुरू केल्यानंतरच महागाई नियंत्रणात येईल. - अशोक वाळुंज, माजी संचालक, एपीएमसी