शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारी पिढीची देशाला गरज

By admin | Updated: October 24, 2016 00:50 IST

ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे

पिंपरी : ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे. अशी संस्कारी पिढी तयार करण्याची देशाला गरज असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला आज त्यांनी भेट दिली. या वेळी समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलमची माहिती दिली. या वेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, गिरीश आफळे, अ‍ॅड. सतीश गोरडे, मुख्याध्यापिका पूनम गुजर, रवी नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतीराम भोईर, शकुंतला बन्सल, मधुसूदन जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्या वेळी शिक्षणाची टक्केवारी कमी होती. ही टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या ठिकाणी हजारो, लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशाचे प्रश्न सुटतील असे वाटले होते; पण आपण केवळ बेरोजगार पिढी तयार करीत आहोत. शिक्षणामुळे अत्याधुनिक पद्धतीकडे आपण गेलो. परंतु शिकून बाहेर पडणाऱ्या पिढीच्या हाताला आणि मेंदूला काम दिले गेले पाहिजे. परंतु त्यांना जेवढ्या संधी प्राप्त करून द्यायला हव्या होत्या, तेवढ्या प्राप्त करून देऊशकलो नाही. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण भरपूर दिले जात आहे. तंत्रज्ञ निर्माण करतोय, शास्त्रज्ञ निर्माण करतोय, सर्व काही देतोय; पण मूल्यांवर आधारित शिक्षण दिले गेले पाहिजे. या वेळी गिरीश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. कल्पना बिचकुले हिने सूत्रसंचालन केले, तर सचिन राठोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)