शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा साठविण्यासाठी हायड्रोजन प्रयोगाची गरज

By admin | Updated: January 16, 2016 01:44 IST

जगभरात सध्या वीजेबाबत मोठे संंशोधन सुरू आहे. तथापि, दीर्घकालीन ऊर्जा साठवणीसाठी अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा आहे. त्यामुळे यावर मात करायची झाल्यास हायड्रोजनसारख्या वायूंचे

मुंबई : जगभरात सध्या वीजेबाबत मोठे संंशोधन सुरू आहे. तथापि, दीर्घकालीन ऊर्जा साठवणीसाठी अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा आहे. त्यामुळे यावर मात करायची झाल्यास हायड्रोजनसारख्या वायूंचे प्रयोग करावे लागतील, अशी सूचना आयआयटीचे माजी संचालक प्रा. सुहास सुखात्मे यांनी केली. भाभा अणुशक्ती केंद्र येथे आयोजित केलेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात ‘विज्ञानवेध २०२५’ उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. सुखात्मे पुढे म्हणाले, देशातील लोक अजूनही गरिबीत जीवन कंठत आहेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आवश्यक आहे. ऊर्जा, जल, वायू या सगळ््या स्रोतांचा लाभ सर्वस्तरांना मिळायला हवा. त्यामुळे देशाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने देश समृद्ध करायचा झाल्यास त्याला सर्वांचीच साथ लागणार आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या मेळ््यात विविध विज्ञान विषयक उपक्रम मांडण्यात आले आहेत. याला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले. यात डॉ. माधुरी शानबाग, डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांना उत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. तर अन्न प्रक्रिया विषयात अमूल्य योगदान दिलेल्या प्रा. रेखा सिन्हा यांना प्रा. मनमोहन शर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाच्या संधाकाळच्या सत्रात पद्मजा फेणाणी यांच्या बहारदार गायनाने रंगत भरली. (प्रतिनिधी)‘विज्ञानाचा मातृभाषेतून प्रसार व्हावा’विज्ञानाची संकल्पना सर्वसमावेशक आहे. विज्ञानात ठसा उमटवायचा असेल, तर विज्ञान घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मातृभाषेतून’ विज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. तरच ‘मेक इन इंडिया’चा मंत्र खऱ्या अर्थाने देशाला लागू पडेल आणि प्रगतीच्या दिशेने देशाची आगेकूच होईल.-डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ.