शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील फुटबॉलला दिशा देण्याची गरज

By admin | Updated: June 29, 2015 00:08 IST

नौशाद मुस्सा : पुणे एफसी अकॅडमीतर्फे १७ व १९ वर्षाखालील फुटबॉलपटूंची निवड चाचणी

कोल्हापूर : कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. फक्त खेळाडूंमध्ये सुधारणा करून चालणार नाही, तर येथील प्रशिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले पाहिजे, असे मत पुणे एफसीच्या १९ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मुस्सा यांनी व्यक्त केले. रुईकर कॉलनी येथील मैदानावर भारतातील अग्रगण्य क्लब असणाऱ्या पुणे एफसी अकॅडमी फुटबॉल संघाकडून कोल्हापुरातील १७ व १९ वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी ते कोल्हापुरात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. मुस्सा म्हणाले, कोल्हापुरात मोठ्या प्रमाणारव मुले फुटबॉलकडे वळत आहेत, ही चांगली बाब आहे. त्यांच्यात गुणवत्तेची कमी नाही. मात्र, मोठ्या स्पर्धेत येथील फुटबॉलपटंूना खेळण्यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल. यासाठी येथील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, चांगली मैदाने, पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. येथील खेळाडूंनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापुरात फुटबॉल खेळाबद्दल असलेली ओढ पाहून मला आनंद वाटतो. त्यांना योग्यरीत्या घडवण्यात त्यांच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. अन्य ठिकाणच्या फुटबॉल प्रशिक्षणाशी तुलना करता येथे काही विशेष फरक असा वाटत नाही. मात्र, येथील प्रशिक्षकांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतल्यास ते जास्त फायद्याचे ठरेल. तसेच प्रशिक्षक असो किंवा खेळाडू त्यांनी आपले गाव सोडण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. या निवडीसाठी पुणे एफसीचे कोल्हापूरचे समन्वयक म्हणून विकास पाटील, पुणे एफसीचे कोल्हापूरचे प्रशिक्षक अमित पोवार मदत करत आहेत. नगरसेवक प्रकाश पाटील, विनायक फाळके यांनी सहकार्य केले.आज शेवट...सकाळी १९ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात आली. आज, सोमवारी सकाळी १७ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेतली जाणार आहे. या दोन्ही वयोगटांतील फुटबॉलपटूंमधील कौशल्य शोधून त्यांना नवीन तंत्रशुद्ध फुटबॉल खेळाचे धडे दिले जाणार आहेत.