शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज - मीरा बोरवणकर

By admin | Updated: March 2, 2016 17:58 IST

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (कन्व्हिक्‍शन रेट) वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्यांच मत मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २ - गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (कन्व्हिक्‍शन रेट) वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्यांच मत राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना मीरा बोरवणकर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. 
 
कसाब आणि याकुबच्या फाशीची मी साक्षीदार असल्याचं सांगत कारागृह कर्मचा-यांनी ठेवलेल्या कमालीच्या गुप्ततेबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांचं कौतुकही केलं. एखाद्याला फाशीवर जाताना पाहणं खुप कठीण असतं त्यामुळे सारखं स्वताशी बोलाव लागतं आणि मी तेच करत होते असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं. कारागृह कर्मचा-यांचा जास्त वेळ हा सुरक्षा आणि व्यवस्थापनातच जातो, कारागृह कर्मचारी दमलेले असतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकांनी, एनजीओनी पुढे येण्याची गरज असल्याचं मीरा बोरवणकर बोलल्या आहेत. कारागृहांमधील आरोपींची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याची कबुलीही मीरा बोरवणकर यांनी दिली आहे. 
 
ठाण्यात महिला पोलिसाला झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना महिला पोलीस असो अथवा पुरुष कोणत्याही पोलीस कर्मचा-याला मारहाण करणे हे गंभीर आहे. याचा त्रास आपल्यालाच होणार आहे असं मत मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केलं आहे. खात्यातील महिला पोलिसांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, महिला पोलिसांवर घरचीही जबाबदारी तितकीच असते. महिला आणि पुरुषांची यशाची व्याख्या वेगळी आहे. महिला पोलिसांसाठी 8 तासांची ड्युटी करण्याची गरज असल्याचं मीरा बोरवणकर बोलल्या आहेत. तुम्हाला खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर सिव्हिल सर्व्हिस आणि पोलीस खाते निवडा मात्र हा 10 ते 6 ऑफिस जॉब नाही हे लक्षात ठेवा असा संदेशही मीरा बोरवणकर यांनी तरुण पिढीसाठी दिला आहे.