शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

By admin | Updated: January 17, 2016 01:01 IST

‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र

- हणमंत पाटील, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) ‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र येऊन पुढील अध्यक्षांची निवड करावी,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रियेची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला. पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी त्यांनी निवडीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात निवडणूकप्रक्रिया बदलण्याविषयी पवार यांच्या मताला अनुमोदन दिले. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड मतदान प्रक्रियेमुळे होत असल्याने अनेक चांगले साहित्यिक संमेलनापासून दूर राहणे पसंत करतात. हे चित्र बदलण्यासाठी निवडप्रक्रिया बदलावी लागेल. मते मिळविण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती नाही. तो आमचा अधिकार आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही. चार ते पाच माजी अध्यक्षांची एकत्र समिती तयार केली, तर या समितीद्वारे खऱ्या अर्थाने उत्तम साहित्यिकांना संधी मिळू शकते. धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता हे चर्चेत असलेले शब्द उच्चारण्यासाठी जितके कठीण आहेत तसेच, ते आचरणात आणण्यासाठी कठीण आहेत, असे पवार यांनी सांगितले. पवारांचा हात असल्याचा गैरसमजमहाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत शरद पवार यांचा हात असल्याचा समज पसरवला जातो. काही तथाकथित विचारवंतांच्या म्हणण्यानुसार संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीतही माझा हात असल्याचा आरोप होतोय, अशा पद्धतीने आम्हाला वादात ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सबनीस यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयुष्यात मी त्यांना प्रथमच भेटलो. उद्या लातूर व कोयनेला भूकंप झाला, तरी पवार यांचा हात असल्याचा समज पसरविला जाईल.- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री