शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात बदलाची गरज

By admin | Updated: June 26, 2015 02:35 IST

देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

पुणे : देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जागतिकीकरणातील वास्तव स्वीकारून आपल्या शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागणार आहेत, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलत होते. राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आदी यावेळी उपस्थित होते. देशातील विद्यापीठांमधून तसेच आयआयटी, एनआयटी सारख्या संशोधन संस्थांमधून गेल्या कित्येक वर्षांपासून एकही नोबेल पारितोषिक मिळविणारा संशोधक निर्माण होत नाही, याबाबत खंत व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले, देशातील विद्यार्थी परदेशी विद्यापीठात जाऊन नोबेल लॉरीएट होतात. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. योग्य मार्गदर्शक शिक्षकही आहेत. आता अधिकाधिक नोबेल लॉरिएट कसे निर्माण होतील या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जर्मनी, अमेरिका, ब्राझील यांसह अनेक विकसनशील देशांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत भारतातील विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले.जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० विद्यापीठांत देशातील एकाही शैक्षणिक संस्था नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.