शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आठ-दहा वर्षांत ‘बुलेट ट्रेन’ची गरज!

By admin | Updated: February 19, 2016 07:20 IST

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आठ ते दहा वर्षांत देशात ‘बुलेट ट्रेन’ची गरज भासणार आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान नेहमीच्या गाड्यांमध्येही वापरता येऊ शकते

नागपूर : बदलत्या तंत्रज्ञानानुसार आठ ते दहा वर्षांत देशात ‘बुलेट ट्रेन’ची गरज भासणार आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान नेहमीच्या गाड्यांमध्येही वापरता येऊ शकते, असे मत मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी येथे व्यक्त केले. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमानंतर श्रीधरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर गाड्यांची आणि ट्रॅकची संख्या वाढविली पाहिजे. एका प्रश्नाच्या उत्तरात श्रीधरन म्हणाले, देशात स्थापन होणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा चांगला ताळमेळ दिसून येतो. त्यामुळे बांधकाम करताना अडथळा फार कमी येतो आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतो. मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना गुंतवणूक आणि बांधकाम खर्च कमी असावा, यावर त्यांनी भर दिला. प्रकल्प पूर्ण करताना शासनावर अवलंबून राहू नये. ६० टक्के कर्जाची गरज भासते. कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी शासनाने ट्रॅक्स फ्री बॉण्ड काढला होता. जनरल कन्सल्टंट नियुक्ती झालेली नाही, पण त्यामुळे नागपूर मेट्रो रेल्वेचे कोणतेही काम थांबले नाही. सिव्हिल आणि तांत्रिक कामे जनरल कन्सल्टंट करतो. ही कामे या प्रकल्पात पूर्वीपासूनच सुरू असल्याचे श्रीधरन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)