शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

महापालिका क्षेत्रात ४० हजार घरे घरपट्टीविनाच!

By admin | Updated: January 6, 2016 00:49 IST

प्राथमिक सर्व्हे : ३४ टक्के लोकांनी केली नव्याने बांधकामे; कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी

सांगली : महापालिकेने तीन महिन्यांपासून शहरातील मालमत्तांचा सर्व्हे सुरू केला आहे. या प्राथमिक सर्व्हेत सुमारे ३४ टक्के नागरिकांनी नव्याने बांधकामे केली असून, त्यांची घरपट्टी विभागाकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संपूर्ण मालमत्तांचा सर्व्हे झाल्यास सुमारे ४० हजार घरे घरपट्टीविनाच आढळून येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला आहे. अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात मूळ इमारतीत बदल करून अनेकांनी वाढीव बांधकाम केले आहे. पण त्याची महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडे नोंद नाही. घरपट्टी विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी आयुक्त अजिज कारचे यांनी मालमत्तांचा सॅम्पल सर्व्हे करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात आयुक्त, उपायुक्तांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले होते. गेल्या तीन महिन्यात ७१७२ मालमत्तांचा सर्व्हे झाला आहे. त्यातील ६११ मालमत्ताधारकांनी वाढीव बांधकाम केले आहे, तर १४०७ नवीन बांधकामे झाल्याचे आढळून आले. या प्राथमिक सर्व्हेत सुमारे ९ टक्के नागरिकांनी मूळ इमारतीत बदल करून वाढीव बांधकाम केले आहे, तर २५ टक्के नवीन बांधकामे झाली आहेत. विशेष म्हणजे या नव्याने झालेल्या बांधकामांची नोंदच घरपट्टी विभागाकडे नाही. हा प्रकार धक्कादायक आहे. सर्व्हेत आढळलेल्या नव्या बांधकामांना घरपट्टी लागू केल्यास महापालिकेला ७४ लाख ३८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. याच धर्तीवर शहरातील १ लाख १२ हजार मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा विचार पुढे आला आहे. संपूर्ण सर्व्हे झाल्यास एकूण मालमत्ताधारकांच्या ३४ टक्के म्हणजे सुमारे ४० हजार घरे कराविनाच आढळून येणार आहेत. (प्रतिनिधी) 

घरपट्टीच्या उत्पन्नासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात ३४ टक्के घरांना करच लागू नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग दिला जाईल. प्राथमिक सर्व्हेत गुंठेवारीतील बांधकामे तपासताना वाढीव बांधकामाची नोंद घेतली जात आहे. त्या वाढीव बांधकामापोटी विकास व प्रशमन शुल्काची नव्याने आकारणी करण्याची सूचना केली आहे. खुल्या व आरक्षित भूखंडावरील पत्र्याच्या शेडला घरपट्टी लागू केली जाणार आहे. त्यामुळे घरपट्टीच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. - संतोष पाटील, सभापती, स्थायी समिती.एटीएम, टॉवरचा कर : बोगसगिरीच अधिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाने मोबाईल टॉवर व एटीएमच्या घरपट्टीत बोगसगिरी केली आहे. टॉवर व एटीएमला वेगवेगळे कर लावले आहेत. एका ठिकाणी एटीएमला ५०० रुपये, तर दुसऱ्या ठिकाणी ४० हजाराची कर आकारणी केली आहे. तोच प्रकार टॉवरबाबतही घडला आहे. महापालिका हद्दीत २११ मोबाईल टॉवर व ८७ एटीएम आहेत. त्यांच्या करात तफावत आढळल्याने स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालिका कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे बदनामी होत असल्याचे सांगत, तीन दिवसात संपूर्ण अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी घरपट्टी विभागाला दिले आहेत. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने मोबाईल टॉवर व एटीएमच्या घरपट्टीत बोगसगिरी केली आहे. टॉवर व एटीएमला वेगवेगळे कर लावले आहेत. एका ठिकाणी एटीएमला ५०० रुपये, तर दुसऱ्या ठिकाणी ४० हजाराची कर आकारणी केली आहे. तोच प्रकार टॉवरबाबतही घडला आहे. महापालिका हद्दीत २११ मोबाईल टॉवर व ८७ एटीएम आहेत. त्यांच्या करात तफावत आढळल्याने स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालिका कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे बदनामी होत असल्याचे सांगत, तीन दिवसात संपूर्ण अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी घरपट्टी विभागाला दिले आहेत.