शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला मिळाले एनडीआरएफचे कवच

By admin | Updated: June 9, 2017 03:17 IST

कठीणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या आव्हानांना तोंड देणारी, कठिणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या पथकाची कायमची निवासव्यवस्था केली असून आठवडाभरातच या पथकाचे अधिकारी-कर्मचारी ठाण्यात दाखल होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना दिली. एनडीआरएफ ही आपत्कालीन क्षेत्रातील नामवंत यंत्रणा आहे. महापूर, मोठे वादळ, इमारत दुर्घटना, दरडी कोसळणे यासारख्या मोठ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. अलीकडेच मुंब्य्रातील रशीद कम्पाउंडमधील आणि ठाण्यातील बी केबिन परिसरात इमारत दुर्घटना घडली होती. या वेळी शहराबाहेरून एनडीआरएफला बोलवण्यात आले होते. भविष्यात ठाणे शहरात अशा घटना घडल्यास हे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी आता महापालिकेने एनडीआरएफला कायमचे ठाण्यात आणले आहे. त्यांना पोखरण रोड नं. २ येथे कायमस्वरूपी निवासाची जागा करून देण्यात आली आहे. शहरातच कायमस्वरूपी ही यंत्रणा आल्याने कोणत्याही क्षणी आणि तातडीने ही यंत्रणा शहरातील मोठ्या घटनेप्रसंगी पोहोचण्यास मदत होणार आहे. एखाद्या मोठ्या, आव्हानात्मक घटनेत पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन एका मर्यादेपर्यंत काम करते. परंतु, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. ही यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत वेळ लागतो. परंतु, आता ठाणे शहरात आल्याने मोठी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत मिळेल. >सुरक्षा बळकटएमएमआरडीए हद्दीत यापूर्वी असलेली ही यंत्रणा आता केवळ ठाणे शहरासाठी नव्हे, तर ठाणे जिल्ह्यासाठी काम करणार आहे. या पथकाला निवासासाठी देण्यात येणाऱ्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक बाबीही महापालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे.