शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाक

By admin | Updated: February 16, 2017 20:11 IST

नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाक

नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाकसोलापूर : आॅनलाईन लोकमतएकीकडे प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिलेले असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना सोलापुरातील प्रचारासाठी वेळ मिळेना. या नेतेमंडळींच्या मागे लागून त्यांना आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतेमंडळींची मात्र दमछाक होत आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अन्य नेत्यांना येथे आणण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न मात्र सुरूच आहेत. दरम्यान, उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानंतरही सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटी बिघाडीच झाली. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चित्र विचित्र झाले आहे. काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. शिवाय काँग्रेसच्या काही नेतेमंडळींनी प्रचारासाठी हजेरी लावली. परंतु राष्ट्रवादीचा एकही नेता अद्याप प्रचारासाठी न आल्याने पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव हे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक यांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी एक जणही प्रचारासाठी तारीख देईना. नवाब मलिक यांच्याशी भारत जाधव यांनी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून सोलापुरातील प्रचार सभेसाठी न येण्याचे स्पष्ट केले. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत़ अशा परिस्थितीत कोणाला आणायचे ? हा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे.