शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची खेळी ठरली यशस्वी

By admin | Updated: February 27, 2017 01:07 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तालुक्यात विरोध संपवायचा प्रयत्न केला, त्यात यश आले.

सोमेश्वरनगर : काकडे घराण्याला जवळ करून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तालुक्यात विरोध संपवायचा प्रयत्न केला, त्यात यश आले. आतापर्यंत पवार यांनी काकडे कुटुंबातील प्रभावी व्यक्तींना बरोबर घेऊन राजकारण केले. आता प्रमोद काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत विरोध संपवला. काकडे हे १२ हजार ७६७ अशा विक्रमी मतांनी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदाच झाला.मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात असलेले प्रमोद काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सतीश काकडे यांच्या पॅनेलमधून राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्या वेळी शेतकरी कृती समितीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्यापूर्वीच प्रमोद काकडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्याप्रमाणेच निवडणुकीच्या काही दिवस आधी प्रमोद काकडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली. हे करत असताना अजित पवार यांनी गेली अनेक दशकांचे पवार आणि काकडे घराण्यामधील राजकीय वैमनस्य संपविले. त्याचबरोबर मागील निवडणुकीत हा गट आणि गणाच्या दोन्ही जागा काकडे यांनी जिंकल्या होत्या. दरम्यान, प्रमोद काकडे हे गावकी आणि भावकीला विश्वासात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनादेखील नमते घ्यावे लागले. ज्यांच्या बरोबरीने पवारांच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्यांच्याच विरोधात सतीश काकडे यांना प्रचार करावा लागला. दिलीप खैरे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. कालचा विरोधक ते आजचा समर्थक, अशी भूमिका सतीश काकडे यांना पार पाडावी लागली. त्यांनी तातडीने प्रमोद काकडे यांना पाठींबा जाहीर केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी मागितलेल्या बारा इच्छुक उमेदवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. इच्छुक असलेल्या बारा उमेदवारांनापैकी धैर्यशील काकडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीमुळे प्रमोद काकडे यांच्या मतांना फटका बसेल, असे बोलले जात असताना याचा राष्ट्रवादीच्या मतदानावर फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. धैर्यशील काकडे यांना केवळ ८९५ मते मिळाली, तर भाजपाचे इंद्रजित भोसले यांना युवा वर्गाचा जास्त पाठींबा असल्याचे चित्र दिसले. परंतु, त्यांना ५ हजार ३२२ मते मिळविण्यात यश आले. या व्यतिरिक्त काँग्रेसचे तानाजी गायकवाड यांना ११६९, तर दुसरे अपक्ष उमेदवार शरद भेलके यांना ११३१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रमोद काकडे यांना २७ हजार २५७ मतांपैकी १८ हजार ८९ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा १२ हजार ७६७ एवढ्या विक्रमी मतांनी काकडे निवडून आले.निंबूत पंचायत समिती गणामध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये राष्ट्रवादीच्या नीता फरांदे यांनी ९०३० मते मिळविली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या मोनिका महानवर यांना २६६८, तर शिवसेनेच्या वंदना शिंदे यांना ७५० मते मिळाली. करंजेपूल गणामध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार उभे होेते. यामध्ये राष्ट्रवादीच्या मेनका मगर यांनी ८७८९ एवढे मताधिक्य घेतले. भाजपाच्या उज्ज्वला सोरटे यांना ४७८३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या नलिनी गायकवाड यांना ४९१ मते मिळाली. काकडेंना बरोबर घेतल्याने राष्ट्रवादीला दुहेरी फायदा झाला. एकीकडे परंपरागत विरोधक संपवला, तर दुसरीकडे विरोधकांसाठी त्यांचाच वापर केला.