शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष !

By admin | Updated: April 4, 2015 04:18 IST

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूझाली असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबादेत यानिमित्ताने दौरे सुरू केले आहेत.

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूझाली असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबादेत यानिमित्ताने दौरे सुरू केले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पालिकेच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही चिंताग्रस्त आहेत. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा फारसा टिकाव लागला नाही. दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेना-भाजपाने कार्यकर्त्यांचे मोठे मेळावे घेतले. त्याशिवाय त्यांचे संपर्कप्रमुख, वरिष्ठ नेते सरकारमध्ये असलेले मंत्री महापालिका निवडणुकीची व्यूहरचना करत आहेत. भाजपाने तर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडेच सर्व सूत्रे सोपविली आहे. काँग्रेस पक्षानेही मरगळ झटकून जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. एमआयएमची व्यूहरचना हैदराबादहून आलेले पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते करीत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर राज्यात चार क्रमांकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळत्या महापालिका सभागृहात ११ नगरसेवक होते. त्यापैकी निवडणुकीआधी काही जणांनी एमआयएम, भाजपा आणि काँग्रेसचा रस्ता पकडला आहे. यामुळे पक्ष कात्रीत सापडला आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांची दोन आकडी संख्या गाठणे हेदेखील पक्षापुढे मोठे आव्हान आहे. पक्षाची ही परिस्थिती असताना कोणताही बडा नेता अद्याप या ठिकाणी फिरकलेला नाही. पक्षाच्या जिल्ह्यातील दोन आमदारांनीही या निवडणुकीत रस दाखविलेला नाही. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर निवडणुका चालल्या असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)