शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांवरील टीकेवरुन शिवसेना - राष्ट्रवादीचा 'सामना'

By admin | Updated: June 11, 2014 18:13 IST

सामनातील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रभादेवी येथील कार्यालयावर धडक देत निदर्शने केली.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १२- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याचे पडसाद सामनाच्या कार्यालयावर उमटले. संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रभादेवी येथील कार्यालयावर धडक देत निदर्शने केली.  यादरम्यान शिवसेनेचेही कार्यकर्ते तिथे पोहोचले व काही वेळेसाठी वातावरण तणावपूर्ण बनले होते. 
फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात पुण्यातील मोहसिन शेख या तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. दिल्लीत सत्ताबदल होताच एका विशिष्ट समुदायावर हल्ले वाढू लागल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या विधानाचा बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला होता. महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर शरद पवारांचा ताळतंत्र सुटला असून ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष  उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संध्याकाळी सामनाच्या कार्यालयावर धडक दिली. कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याची माहिती मिळताच शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी सामनाच्या कार्यालयाजवळ रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची तुकडी तैनात केली आहे.