शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके लवकरच शिवसेनेत!

By admin | Updated: June 18, 2017 02:24 IST

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट.

नंदकिशोर नारे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून राष्ट्रवादीचे वाशिम जिल्ह्यातील नेते माजी आमदार प्रकाश डहाके यांचा शिवसेनेत प्रवेश होणार, या चर्चेवर डहाके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिक्कामोर्तब झाले आहे. शनिवारी डहाके यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने येत्या काही दिवसांतच डहाके यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित असल्याचे बोलल्या जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले प्रकाश डहाके यांना गत विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्या त आली. पक्षावर नाराज असलेले प्रकाश डहाके तेव्हापासून शिवसेनेच्या संपर्कात होते. बर्‍याचदा त्यांचा पक्षप्रवेश झाल्याच्या वावड्या उडाल्या होत्या; परंतु त्यांनी दुजोरा दिला नव्ह ता. शनिवार, १७ जून रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा झाल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेट घेतल्याचा दुजोरा दिला. प्रकाश डहाके हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे डहाके यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुधीर कव्हर होते. यावेळी निवडणूक अर्ज भरण्याच्या अगोदरच्या दिवशी प्रकाश डहाके यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असता संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाली होती. यावेळी मात्र त्यांनी येत्या विधानसभेला बराच अवधी असताना संपर्क केल्याने शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कारंजा विधानसभा म तदारसंघाकडून शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून चालत आहे. डॉ. राठोड यांच्या सर्मथकांमध्ये तर चक्क निवडणुकीची तयारी चालविली असताना प्रकाश डहाके यांचा प्रवेश येत्या विधानसभा की लोकसभा निवडणुकीसाठी आहे, यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून, त्यांनी आपले स्वागत केले आहे. लवकरच शिवसेनेत आपण प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेश कुठे, कसा व कधी करायचा, हे ठरवून प्रवेश होणार आहे. मग तो कारंजा येथेसुद्धा होऊ शकतो.- प्रकाश डहाके, माजी आमदार, कारंजा विधानसभा मतदारसंघ.