शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

राष्ट्रवादीचे अंदाज चुकले

By admin | Updated: May 17, 2014 04:43 IST

नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग,’ मोदींची हवा मीडियाने तयार केली असून ती प्रत्यक्ष प्रचारात मला कुठेही दिसत नाही,

नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग,’ मोदींची हवा मीडियाने तयार केली असून ती प्रत्यक्ष प्रचारात मला कुठेही दिसत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठासून सांगत होते, पण हेलिकॉप्टरमधून जाताना खालच्या गावांविषयी खडान्खडा माहिती देणार्‍या पवारांना मोदी हवेचा अंदाज न आल्याने राष्ट्रवादीची दुर्गती झाली. मोदींची हवा नव्हती तर मोठे साहेब स्वत: का लढले नाहीत; ते आधीच राज्यसभेत का गेले? हवेचा अंदाज एकतर त्यांना नव्हता किंवा होता तर त्यांनी तो स्वत:पुरताच ठेवला का, असे प्रश्न आता विचारले जातील. आजच्या निकालाने शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान आता जवळपास संपुष्टात आले आहे. पक्षाचे वजनदार नेते रिंगणात उतरविले की काम सोपे होईल, हा होराही पार चुकला. कारण पवार ज्यांना वजनदार समजत होते त्यांनाच आडवे करण्याचे मतदारांनी ठरविले आहे, याचा अंदाजही त्यांना आला नाही. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, डॉ. पद्मसिंह पाटील, सुनील तटकरे, मनीष जैन, नवनीत कौर-राणा आदी पालापाचोळ्यासारखे उडाले. दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नसलेल्यांच्या माथी जबरदस्तीने उमेदवारी मारण्यात आली. आता लोकसभेत आपटी खाल्ल्याने विधानसभेतील त्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.