शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला काँग्रेसचे चोख उत्तर

By admin | Updated: January 20, 2017 04:19 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची बोलणी सुरू

पंकज रोडेकर,

ठाणे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची बोलणी सुरू असून अद्यापही कळवा, मुंब्य्राच्या मुद्यावरून आघाडीचे घोडे अडले आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेऊन काँग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वच जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता काँग्रेसनेदेखील सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादीला तिष्ठत ठेवून सर्व जागांसाठी मुलाखती घेण्याचे निश्चित केले आहे. परंतु, या मुलाखतींच्या कार्यक्रमाची तारीख त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आघाडीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ठाणे महापालिका निवडणूक आघाडी करून लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली असून त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यातील बोलणी पुढे सरकली आहे. येत्या २१ जानेवारीला मुंबईत आघाडीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. परंतु, असे असले तरीदेखील कळवा, मुंब्य्राच्या मुद्यावरून आघाडीत यापूर्वीच बिब्बा पडला आहे. राष्ट्रवादी कळवा, मुंब्य्राबाबत आग्रही असून काँग्रेसदेखील कळवा, मुंब्रा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे वेळ पडल्यास राष्ट्रवादीशी कट्टी घेऊन सपाबरोबर घरोबा करण्याची तयारीदेखील काँग्रेसने केली आहे. महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत लोकशाही आघाडी होऊनही सत्तेपासून त्यांना लांब राहावे लागले. हीच सल भरून काढण्यासाठी २०१७ च्या निवडणुकीत आघाडी करून सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. त्यानुसार, पहिल्या बैठकीपासून दोन्ही काँग्रेसने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या गळाला मुंब्य्रात काँग्रेसचे काही मासे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद या पट्ट्यात आणखी वाढली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या ठाण्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीला हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु, असे असले तरी कळवा, मुंब्य्राचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. काँग्रेसनेही दगाफटका होऊ नये, म्हणून सावध पवित्रा घेऊन सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मुलाखतींच्या तारखा अद्याप निश्चित नसल्या तरी २१ जानेवारीनंतर आघाडीची काय बोलणी होते, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.