शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’

By admin | Updated: July 5, 2015 02:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी केली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केल्यानंतर अहिर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना मुंबईच्या पायाभूत सुविधांवर आम्ही भर दिला. मात्र जून महिन्यातील पहिल्याच पावसात या शहराची दैना उडाली. त्यास महापालिकेची कुचकामी नालेसफाई जबाबदार आहे, असे सांगून तटकरे यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीवर हल्ला केला. अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्ष मजबूत होईल व मुंबईच्या समस्यांवर आंदोलन करील, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीची व्होटबँक तयार झाली नाही. त्यामुळे स्वबळावर येती महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अहिर यांनी सांगितले. मैदाने नसल्याने उत्सव रस्त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवांच्या काळात मंडप उभारणे व ध्वनिप्रदूषण याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. उत्सव हे शहरे निर्माण होण्यापूर्वीपासून साजरे केले जात आहेत. उत्सव साजरे करण्याकरिता पुरेशी मैदाने नसल्याने नाइलाजाने रस्त्यांवर मंडप घालण्यास परवानगी द्यावी लागते. सरकारने याबाबत बैठक बोलावली असून त्यामध्ये आम्ही आमची भूमिका मांडू, असे सचिन अहिर म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)तटकरेंचा काँग्रेसला टोलावादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत नसल्याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, काही मंडळींकडून बोलल्यासारखे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात काही केले जात नाही. विधिमंडळ अधिवेशनात समन्वय साधून दोन्ही काँग्रेस दुबार पेरणीचे संकट, सावकारी कर्जमाफी वगैरे प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणार आहे.