शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला जुन्या सुभेदारांचेच आव्हान

By admin | Updated: February 17, 2017 01:06 IST

राष्ट्रवादीकडून विकासाचे मॉडेल म्हणून उदाहरण दिल्या जाणाऱ्या पवारांच्या पिंपरी-चिंचवड या गडालाच त्यांच्याच पक्षातील शिलेदारांच्या

विजय बाविस्कर / पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादीकडून विकासाचे मॉडेल म्हणून उदाहरण दिल्या जाणाऱ्या पवारांच्या पिंपरी-चिंचवड या गडालाच त्यांच्याच पक्षातील शिलेदारांच्या माध्यमातून सुरुंग लावण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आणि अस्तित्वाची लढाई समजून राष्ट्रवादीने लावलेली ताकद यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेतील लढत अटीतटीची बनली आहे. पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघात या भागाचा समावेश होता. मात्र, शरद पवार यांनाही येथून तुलनेने मताधिक्य मिळत नव्हते. त्यामुळे माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडकडे लक्ष घातले. नेत्यांना ताकद दिली. मात्र, त्यातून राज्याचीच लहान आवृत्ती येथे झाली. नेत्यांचे सुभे निर्माण झाले. या सगळ्या शिलेदारांनी आपापले गड तयार केले. २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने पावले टाकून या शिलेदारांनाच आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली. त्याची सुरूवात आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यापासून झाली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आझमभाई पानसरे यांच्यासारख्या पवारांचा निष्ठावानही भाजपवासी झाला. याच ताकदीवर आता भाजप पिंपरी-चिंचवडचा गड काबीज करण्यासाठी निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी रणशिंग फुंकले आहे. २००२ पासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. पवारांचा हा गड काबीज करण्याची मुख्यमंत्र्यांनी शहरातील खासदार अमर साबळे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन या जुन्या कार्यकर्त्यांना बळ देऊन आणि पवारांचे एकेकाळचे शिष्य आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांची मोट बांधून लक्ष्य २०१७ रणशिंग फुंकले आहे. भाजपाच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत: लक्ष घातले आहे. विकासाचा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरले आहेत.