शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याआदिती तटकरे

By admin | Updated: March 20, 2017 17:56 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.

जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत

अलिबाग दि.20 - रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शे.का.पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख यांनी दिली आहे.

रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया गेल्या 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊ न पार पडली या निवडणूकीत शे.का. पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले असून 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या स्व.ना.ना. पाटील सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीची महत्वपूर्ण बैठक रविवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासमवेत पनवेल येथे कर्नाळा भवनमध्ये पार पडली असून अध्यक्षपदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नावावर सहमंती दर्शविली आहे. मंगऴवारी दि. 21 मार्च 2017 रोजी होणा:या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित झाली आहे, असे अ‍ॅड. देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

निवडणूक बिनविरोध होणार नाहीदरम्यान मंगळवारी होणारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. या दोन्ही पदांकरीता आम्ही उमेदवार उभे करणार असून त्यांना विजयी करण्याच्या अनूशंगाने एका राजकीय पक्षाच्या नेत्यां बरोबर चर्चा सुरु असून निकाल मंगळवारीच कळेल,अशी माहिती शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी दिली आहे.

रायगड जि.प.पक्षीय बलाबलरायगड जिल्हा परिषदेच्या एकुण 59 जागांपैकी शेकाप-23, राष्ट्रवादी काँग्रेस-12,काँग्रेस-03 तर शिवसेना-18 व भाजपा-3 असे पक्षीय बलाबल आहे.