शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी - मोदी

By admin | Updated: October 12, 2014 19:31 IST

एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.

ऑनलाइन लोकमत

लोहा/ ठाणे, दि. १२ -  एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. त्यांची निशाणी असलेल्या घडाळ्याचा '१० वर्षात १० पटीने भ्रष्टाचारात वाढ' हाच अर्थ आहे असा टोलाही मोदींनी लगावला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी लोहा, ठाणे, पंढरपूर तुळजापूर येथे प्रचारसभा घेतली. या सभांमध्ये मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यातील अनागोंदी कारभार माहित असूनही काँग्रेसने काहीच केले नाही. त्यांनी फक्त मुख्यमंत्री बदलून शिफ्ट सिस्टम आणली असा टोला नरेंद्र मोदींनी ठाण्यातील सभेत लगावला. मुंबईवर दहशतवादी हल्ले होत असताना राज्याचे गृहमंत्री अशा छोट्या मोठ्य घटना घडतातच असे विधान कसे करु शकतात ? आता राज्यातील जनतेनेही १५ ऑक्टोंबरला भाजपला मत देऊन छोटीमोठी गोष्ट घडवावी असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यातील भ्रष्टाचार १५ पटीने वाढेल असे सांगत जनतेने संधी दिल्यास आम्ही त्यांचे भाग्य बदलून दाखवू. भाजपला बहुमताने निवडून दिल्यास पाच वर्षानंतर सरकारच्या कामकाजाचा हिशोब तुम्हाला देऊ असेही मोदींनी नमूद केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या भ्रष्टाचारी पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्यावरच राज्याचे भले होईल असे मोदींनी म्हटले आहे.