मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्जपुरवठा करावा, मालवणीसारखे दारूकांड पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करावी आणि मुंबई महापालिकेच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वत: तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी सुरू आहे. एसीबीने टाकलेल्या धाडीत भुजबळांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जगजाहीर झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई नाही, असे सांगत असतानाच ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढल्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे आणि मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले!
By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST