शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेसह राष्ट्रवादीला पक्षांतराचा ‘दे धक्का’

By admin | Updated: April 30, 2016 02:09 IST

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राजकीय पक्षांमधील अंतर्गत कुरघोडी वाढत आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राजकीय पक्षांमधील अंतर्गत कुरघोडी वाढत आहेत. अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. तर नाराजांकडून बाहेरचा रस्ता पत्करला जात आहे. मनसे आणि राष्ट्रवादीमधील खदखद बाहेर येत आहे. याचाच टे्रलर म्हणून की काय शुक्रवारी मनसे, राष्ट्रवादीसह एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक नाराज नगरसेवक पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. मनसेचे तब्बल बारा नाराज नगरसेवक ‘शिवसेने’च्या वाटेवर असल्याची माहिती होती. शुक्रवारी मनसेचे चांदिवली विभागातील वॉर्ड क्रमांक १५१ चे नगरसेवक ईश्वर तायडे, वॉर्ड क्रमांक १५० च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता पवार आणि वॉर्ड क्रमांक १६४ चे नगरसेवक विजय तांडेल यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.दरम्यान, ईश्वर तायडे हे मनसेचे चांदिवली विभागाचे अध्यक्ष होते. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आमदारकीही लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर तायडे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. तायडे यांचा शिवसेनेतील प्रवेश मनसेसाठी धक्का मानला जात आहे. सविता पवार यांच्या सेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत राजकारण देखील उफाळून आले आहे.मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे हेदेखील शिवसेनेत जाणार असल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. परंतु लांडे यांनी हे फेटाळून लावले आहे. ‘मी आहे तेथे समाधानी आहे आणि मी राज यांचा निष्ठावान कार्यकर्ता’ असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)