शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार!

By admin | Updated: July 12, 2014 01:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामदास रामटेके यांच्यावर देशकट्टा व तलवारींनी प्राणघातक हल्ला.

अकोला : अकोला महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामदास रामटेके यांच्यावर देशकट्टा व तलवारींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रामटेके गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामटेके यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, त्यांचा उजवा हात कापावा लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नगरसेवक अजय रामटेके यांच्यासह मोहम्मद फजलू पहेलवान व त्यांचे ना तेवाईक रसूल खान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. ते शुक्रवारी सकाळी मुंबई हावडा मेलने अकोल्यात पोहोचले. तिघेही ऑटोरिक्षाने जुने शहरातील गुलजारपुर्‍याकडे जात असताना, दामले चौकात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या ६ आरोपींनी ऑटोरिक्षा अडविली. त्यानंतर आरोपींनी देशी कट्टय़ाने अजय रामटेके यांच्या दिशेने दोन गोळय़ा झाडल्या. पहिली गोळी रामटेके यांच्या उजव्या खांद्याला स्पर्श करून गेली. आरोपींनी लगेच दुसरी गोळी झाडली. ही गोळी रामटेके यांच्या खांद्याला लागली. त्यानंतर रामटेके जीव वाचविण्यासाठी ऑटोरिक्षाच्या बाहेर पडले; परंतु आरोपींनी त्यांना घेरून डोक्यावर, हात आणि पायांवर तलवारीने घाव घातले. रामटेके रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. हल्ल्याच्यावेळी आरोपी व रामटेके यांच्यात चांगलीच झटापट झाली. यात रामटेके यांचे दोन्ही हात व मांडीवर गंभीर दुखापत झाली. त्यांचा उजवा हात पूर्णत: निकामी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भयभीत झालेले नगरसेवक मोहम्मद फजलू व रसूल खान हे रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या दिशेने धावले. त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचून रामटेके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, या प्रकरणाला पूर्ववैमनस्याची किनार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. याप्रकरणी ६ आरोपींवर भादंविचे कलम ३0७ (प्राणघातक हल्ला) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. २८ मे २0१२ रोजी रामटेके यांच्यावर अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यावेळी एक गोळी त्यांच्या कानाशिलाजवळ आणि दुसरी मांडीत घुसली होती.