शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

21 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे 159 अपक्ष

By admin | Updated: September 1, 2014 23:28 IST

शहर व जिल्हय़ातील 21 मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 159 अपक्ष उमेदवार उभे होते.

पुणो : शहर व जिल्हय़ातील 21 मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 159 अपक्ष उमेदवार उभे होते. सर्वाधिक 14 अपक्ष पर्वती मतदारसंघातून तर सर्वात कमी 2 खेड आळंदी मतदारसंघातून उभे होते. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केलेल्या तिघांना या निवडणुकीत यश मिळाले.
कसबा आणि कँटोन्मेंट मतदारसंघातून 13 उमेदवार उभे होते. त्यांच्याशिवाय बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, रिपाई डेमोक्रॅटीक, भारतीय बेरेाजगार मजूर किसान दल या पक्षांच्या उमेदवारांनी तसेच ¨हदु महासभेच्या उमेदवारानेही निवडणूक लढविली.
भोसरीतून 11 अपक्षांशिवाय ¨हदुस्तान जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी तसेच बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महिला उमेदवारांना संधी दिली असली तरी राष्ट्रवादीच्या पुरूष बंडखोराने 1272 मतांनी बाजी मारली.
¨पंपरी व इंदापूर मतदारसंघातून प्रत्येकी 1क्जण रिंगणात होते. इंदापूरमध्ये जनता दल,भारिप बहुजन महासंघ, प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा भरणा असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बंडखोराने दुस:या क्रमांकाची मते घेतली.
हडपसर व चिंचवड मतदारसंघातून प्रत्येकी 9 जणांनी निवडणूक लढविली. हडपसरमध्ये लोकजनशक्ती, जनता दल,भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघ,ऑल इंडिया डेमोक्रॅटीक फ्रंट याही पक्षांचे उमेदवार उभे होते. चिंचवड मतदारसंघातून समाजवादी पक्ष,भारिप बहुजन महासंघ, बसप यांच्याखेरीज शिवसेना व काँग्रेसचे उमेदवार प्रतिस्पर्धी होते. येथेही अपक्ष 6575 मतांनी राष्ट्रवादीच्या बंडखोराने यश मिळविले.
वडगाव शेरीतून 7 अपक्ष होते. बसप, प्रबुद्ध रिपाई, रिपब्लिकन(अे) रिपाई या पक्षांचे उमेदवार उभे होते. राष्ट्रवादी व शिवसेनेत प्रमुख लढत झाली. मनसेला तिस:या क्रमांकाची मते मिळाली. प्रत्येकी 8 अपक्षांनी शिवाजीनगर, कोथरूड  आणि भोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. शिवाजीनगरमधून अखिल भारतीय सेना, भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघ, प्रबुद्ध रिपब्लिकन 
पक्ष, रिपब्लिकन पक्ष, बसप या पक्षांखेरीज काँग्रेस-भाजप प्रतिस्पर्धी होते. मनसेनेही उमेदवार उभा केला होता.
प्रत्येकी 6 अपक्षांनी खडकवासला, शिरूर, दौंड, आंबेगाव या मतदारसंघातून निवडणूक उभे होते. आंबेगावमधील अपक्षांमध्ये सुरेश भोर या सेनेच्या बंडखोराचा समावेश होता. राष्ट्रवादी व शिवसेना यांची प्रमुख लढत झाली. मनसे,बसप,रिपाईचे उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात होते. शिरूरमधून राष्ट्रवादी-भाजप अशीच लढत होऊन साडेसात हजार मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने विजय मिळविला. दौंडमधून स्वाभिमानी पक्षासह राष्ट्रवादीचे राहुल कुल व भाजपचे वासुदेव काळे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होऊन राष्ट्रवादीचे बंडखोर रमेश थोरात 17 हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले. खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी-मनसे यांच्यात प्रमुख लढत होऊन भाजपला तिस:या क्रमांकाची मते मिळाली. (प्रतिनिधी)
 
गेल्या निवडणुकीतील प्रमुख वैशिष्टय़े पाहता भोसरीमध्ये महिला उमेदवारांमध्ये पुरूष उमेदवाराने बाजी मारली. तर कोथरूडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार चवथ्या क्रमांकावर गेला. मनसेने खडकवासल्यातून अनपेक्षित मुसुंडी मारली. तर इंदापूरमध्ये काँग्रेसच्या बलाढय़ उमेदवाराचे मताधिक्य बंडखोरीमुळे घटले. राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांना ग्रामीण तर 2 जणांना शहरी भागातून संधी मिळाली. काँग्रेसला ग्रामीण व शहरातील प्रत्येकी 2 मतदारसंघात यश मिळाले. भाजप व शिवसेनेला प्रत्येकी 3 मतदारसंघांमधून 
विजय मिळाला.
 
च्कोथरूडमधून ¨हदु महासभेच्या उमेदवाराने निवडणूक लढविली. राष्ट्रीय समाज पक्ष, बसप, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिनक पार्टी या पक्षांचे उमेदवारही रिंगणात होते. शिवसेना आणि मनसे या मतदारसंघात प्रमुख प्रतिस्पर्धी ठरून आघाडीतील घटक पक्षापैकी राष्ट्रवादीचा उमेदवार चवथ्या क्रमांकावर तर काँग्रेसचा बंडखोर उमेदवार तिस:या क्रमांकावर होता.