शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नईमची कोलकाता पोलिसांना तुरी

By admin | Updated: August 26, 2014 03:55 IST

लष्कर ए तोयबाचा संशयित अतिरेकी व औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल नईम शेख उर्फ समीर काल कोलकाता पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला.

मुुंबइ : लष्कर ए तोयबाचा संशयित अतिरेकी व औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल नईम शेख उर्फ समीर काल कोलकाता पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. कोलकाता पोलीस नईमला घेऊन मुंबईच्या वाटेवर होते. रेल्वे प्रवासात छत्तीसगढ परिसरात नईमने पोलिसांच्या हातावर तुरी दिली.दरम्यान, लष्करचे प्रमुख अतिरेकी झियाबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल, फैयाज कागजी यांच्या संपर्कात असलेल्या आणि भारताविरोधी कारवायांसाठी बांगलादेशात बेस तयार केलेल्या नईमचे पसार होणे देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी धक्का मानला जात आहे. तूर्तास राज्य दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) औरंगाबाद पोलीस आणि अन्य पोलीस यंत्रणांनी नईमचा शोध सुरू केला आहे. नईम मूळचा औरंगाबादचा. त्यामुळे त्याच्या पलायनानंतर स्थानिक पोलीस आणि एटीएसने औरंगाबाद रडारवर घेतले. नईमचे नातेवाईक, मित्र परिवारावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असेल. शिवाय भारत-बांगलादेश सीमेवर त्या त्या राज्यांचे पोलीस आणि सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना सतर्क करण्यात आल्याची माहिती मिळते.लष्करच्या अतिरेक्यांनी २००६ साली दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रसाठ्याची तस्करी केली. हा साठा औरंगाबादेत आणला. एटीएस व स्थानिक पोलिसांनी लागोपाठ दोन कारवाया करून हा शस्त्रसाठा पकडला. त्यात १६ एके ४७ रायफल, ६२ मॅगझीन, ३२०० जिवंत काडतुसे आणि ४३ किलो आरडीएक्स होते. या कारवायांमध्ये दोन जीपही जप्त केल्या होत्या. पोलिसांनी नईमसह एकूण २१ आरोपींना या प्रकरणी गजाआड केले. पोलिसांच्या आरोपानुसार नईमने बांगलादेशात आपला तळ तयार केला होता. पोलिसांची धरपकड सुरू झाल्यानंतर शस्त्रसाठ्यात सहभागी असलेल्या अतिरेक्यांना त्याने बांगलादेशात आसरा आणि सर्वतोपरी सहकार्य केले होते. पुढे वर्षभराने भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने त्याला पकडले व मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. लष्करचा प्रमुख अतिरेकी फैयाज कागजीने नईमला संघटनेत सहभागी करून घेतले. तर २००६च्या शस्त्र तस्करीत नईम जुंदालच्या संपर्कात होता. जुंदाल या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. (प्रतिनिधी)