शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नयना पुजारी खूनप्रकरणी तिघे दोषी

By admin | Updated: May 9, 2017 02:47 IST

पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २६) हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २६) हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले. खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारपक्षाकडून केली जाणार असून, आज (मंगळवारी) युक्तिवाद केला जाणार आहे.योगेश अशोक राऊत (वय २९ गोळेगाव, आळंदी, ता.खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (२६, सोळू,खेड ), विश्वास हिंदूराव कदम (२७, दिघी आळंदी रस्ता, ता. खेड, मूळगाव भुरकवाडी, खटाव, सातारा) अशी दोषी ठरवलेल्यांची नावे आहेत. राजेश पांडुरंग चौधरी (वय २६, राहणार गोळेगाव, आळंदी, ता.खेड) या माफीच्या साक्षीदाराला दोषी ठरवलेले नाही. आॅक्टोबर २००९ रोजी घडलेल्या या घटनेचा निकाल लागण्यास सात वर्षांचा कालावधी लागला. सरकारपक्षाकडून ३७ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांना सत्यम निंबाळकर, ॠषीकेश कांबळे यांनी सहकार्य केले. बचाव पक्षातर्फे बी. ए. अलुर, रणजीत ढोमसे पाटील, अंकुशराजे जाधव यांनी १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या.युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र येरवडा कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आरोपींना हजर करण्यात तासभर विलंब झाला. त्यामुळे न्यायालयाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली. आरोपींना न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी न्यायासनासमोर उभे करुन त्यांच्यावरील आरोपांचा सारांश सांगितला. सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद ऐकून उद्या (९ मे)आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायाधीश येनकर यांनी स्पष्ट केले. नयना पुजारी कामावरून घरी जात असताना रात्री खराडी बायपास येथे उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश राऊत याने नयना यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून निर्जन भागातून घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर तीनदा बलात्कार केला. नंतर खून करुन ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला. हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात ८आॅक्टोबर २००९ रोजी दाखल झाला.