शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी केली अपहृत पोलिसाची हत्या

By admin | Updated: May 17, 2016 03:13 IST

नक्षलवाद्यांनी अपहृत पोलिसाची हत्या करून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भामरागडपासून सात किमी अंतरावरील आरेवाडा गावाजवळ टाकून दिला.

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी अपहृत पोलिसाची हत्या करून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भामरागडपासून सात किमी अंतरावरील आरेवाडा गावाजवळ टाकून दिला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भामरागड एलओएस नक्षली दलमचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोलिसाची सहा दिवसांपूर्वी अपहरण झाले होते.भामरागड तालुक्याच्या कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कार्यरत बंडू गिसू वाचामी (२८) हे १० मे रोजी दुचाकीने गडचिरोलीकडे जात असताना माओवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत होते. पोलीस दलाने याबाबत दुजोरा दिलेला नव्हता. त्यांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात मोहीम राबविण्यात आली. परंतु रविवारपर्यंत वाचामी यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.त्यानंतर रविवारी सायंकाळी पोलिसांनी वाचामी यांच्या अपहरणाचा अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोमवारी पहाटेच वाचामी यांचा मृतदेह आरेवाडा गावाजवळील बांबू डेपोजवळ पडून असल्याचे दिसून आले. कानाच्या खालच्या भागाला गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक वर्षाचा मुलगा, भाऊ, बहिण, आई असा आप्तपरिवार आहे. (प्रतिनिधी)नक्षलवाद्याला अटकधानोरा तालुक्याच्या जारावंडी परिसरात गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दल १९२ डी व एफ बटालियनने मोहीम राबवून जहाल नक्षलवादी रमेश कोको कोरामी (३५) याला रविवारी अटक केली. कोरामी हा नक्षल प्लाटून दलम क्रमांक ३ चा सदस्य व अ‍ॅक्शन टीम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चार लाखांचे बक्षिसही असून छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्यात आठ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.