नागपूर : छत्तीसगडमधील बस्तर भागातील बिजापूर व कांकेर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षादलांच्या ऑपरेशनमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पुढील वर्षीपर्यंत देश नक्षलमुक्त होईल, असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. मागील १० वर्षांत सुरक्षादलांनी नक्षलवाद्द्यांची कोंडी केली. १० वर्षांतच नक्षलवाद्यांचे अस्तित्व ३८ जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले आहे. या संघटनांवर प्रहार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
नक्षल हिंसाचाराला बसला लगाम वर्ष घटना मृत्यू२०१० १९३६ १००५ २०१४ १०९१ ३१०२०२४ ३७४ १५०
पायभूत सुविधा उभारण्यावर भर नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे...काही वर्षांत नक्षल्यांची आत्मसमर्पण योजना, कम्युनिटी पोलिसिंग, जिल्हा सुरक्षा समिती उपक्रमांसाठी ३ हजार २६० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ३८ जिल्ह्यांत ७ हजार टॉवर्स उभारले. कम्युनिकेशन नेटवर्क मजबूत करण्यावर भर देण्यात आला.