शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलींचा महिलेवर अत्याचार, १० वर्षांचा कारावास कायम

By admin | Updated: June 16, 2014 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्ट : गडचिरोली जिल्ह्यातील घटनानागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.सुनील दशरथ गावडे (२६) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो गोदलवाही, ता. धानोरा (गडचिरोली) येथील रहिवासी आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव आनंदराव लख्खू उसेंडी आहे. तिसरा आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. धानोरा पोलिसांनी घटनेच्या तपासानंतर गावडे व उसेंडीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गडचिरोली सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३७६(२)(जी) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष, कलम ३२३ अंतर्गत ३ महिने, तर कलम ५०६ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध गावडेने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता गावडेचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.ही घटना २९ जुलै २००९ रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. धानोरा तालुका नक्षलग्रस्त भाग आहे. २८ जुलै २००९ रोजी नक्षलींनी बंद पुकारला होता. आश्रम शाळेने बंद पाळला नव्हता. यामुळे नक्षली चिडले होते. बंदचे आवाहन झुगारण्याचे कारण विचारण्यासाठी आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलात आश्रम शाळा कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. दरम्यान, गावडेने एका महिलेचा विनयभंग केला. यानंतर तिन्ही आरोपींनी आश्रम शाळेच्याच एका महिलेवर जंगलात नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. पीडित महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. त्यावेळी मुले बाहेरगावी शिकत होती. सोबत कोणीच नसल्याने पीडित महिला शेजारी कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी झोपायला गेली होती. आरोपी तिला धाक दाखवून जंगलात घेऊन गेले होते. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले होते. (प्रतिनिधी)