शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात वर्धा येथील जवान शहीद

By admin | Updated: March 12, 2017 00:22 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 11 सीआरपीएफ जवान शहीद झालेत. भेज्जी परिसरात आज सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 11 - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 11 सीआरपीएफ जवान शहीद झालेत.  भेज्जी परिसरात आज सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली,  यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोनोरा (ढोक),( ह मु  नाचणगाव ) येथील प्रेमदास मेंढे हा जवान शहीद झाला. त्याचबरोबर शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. ही घटना आज सकाळी 9 च्या सुमारास घडली. 
अत्यंत गरीब परिस्थितीतुन  प्रेमदास मेंढे पुढे आलेत. त्यांचे वडील नाचणगाव येथे आजही हातमजुरी करतात. प्रेमदास मेंढे हे तीन भावांपैकी सर्वात धाकटे. अतिशय मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाचे प्रेमदास हे सुमारे 15 वर्षापासून केंद्रिय राखीव पोलीस बलात कार्यरत होते.यापूर्वी त्यांनी गडचिरोली,  श्रीनगर, पुणे,तळेगाव  येथे काम केले. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगढ येथे बदली झाली होती. 19 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा देशसेवेच्या कार्यात रुजू झाले होते. तसेच, मागच्या  महिन्यातच ते कुटुंबियांच्या भेटीसाठी  घरी आले होते. दरम्यान, आज झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात  देशासाठी ते शहीद झाले. त्यांच्या मागे आई -  वडील पत्नी, मुलगा, मुलगी,  दोन भाऊ तसेच मोठा आप्त परिवार आहे.
 
उद्या आणणार पार्थिव 
प्रेमदास मेंढे या शहिद  जवानाचे पार्थिव उद्या सकाळी रायपूर येथून वर्धा येथे विमानाने आणण्यात येणार आहे. वर्धा येथून गाडीने ते  नाचाणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येईल. नाचाणगाव येथेच त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात येतील.