शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीनवर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: January 18, 2016 03:12 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी नवाजुद्दीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील झोहरा आघाडीनगर जेएनके सोसायटीमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हरहुन्नरी अभिनेता म्हणून नावारूपास येत असलेल्या नवाजुद्दीनचा सोसायटीतील अन्य रहिवाश्यांशी गेल्या काही दिवसांपासून कार पार्किंगवरून वाद सुरू होता. तो त्याच्या पार्किंगशिवाय अन्य जागेतही आपली कार पार्क करत असल्याने, सोसायटीने त्याला यापूर्वी नोटीस दिली होती. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. रविवारी दुपारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक जण मोटारसायकल लावत असताना नवाजुद्दीनच्या बॉडीगार्डने त्याला अडवले. त्यावरून वाद झाल्यानंतर अन्य फ्लॅटधारकही तिथे जमले. हा प्रकार समजल्यानंतर नवाजुद्दीनही फ्लॅटमधून खाली आला. तिथे असलेल्या एका महिलेबरोबर त्याचा वाद झाला. नवाजुद्दीनने आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत तिने नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. तिच्या तक्रारीनुसार नवाजुद्दीन सिद्धीकीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे, या प्रकरणी त्याच्यासह साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे वर्सोवा पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)