शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 19:00 IST

निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत.

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी रविवारी निषेध मोर्चा काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांनी तालुक्यातील आणेवाडीत शेती घेऊन त्यात घर बांधून काही काळ राहत होते. या काळात त्यांनी तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार केले. जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यामुळे जावळीच्या सुपुत्रासाठी जावळीकर एकवटू लागले आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.पाकिस्तान सरकारच्या निषेधार्थ सायगाव पंचक्रोशीतील युवकांनी एकत्र येऊन रविवारी निषेध मोर्चा काढला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय-हाय, भारत सरकार आगे बढ़ो या घोषणा दिल्या. यावेळी मर्ढे, आनेवाडी, सायगाव, खर्शी, दरे खुर्द या गावातील असंख्य युवक सहभागी झाले होते. भाजपचे जिल्हा परिषद गट नेते दीपक पवार म्हणाले, जावळीचे सुपुत्र आणि अभिमान असलेले कुलभूषण जाधव हे निर्दोष असून, त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचा आम्ही जावळीकर जनता निषेध करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कुलभूषण यांच्या सुटकेसाठी निवेदन पाठवणार आहोत. जावळी शिवसेना प्रमुख प्रशांत तरडे म्हणाले, भारत सरकारने कुलभूषण जाधव यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना भारतात परत आणावे. मोर्चात सतीश भोसले, लक्ष्मण भोसले, सचिन भोसले, सुहास भोसले, प्रमोद दीक्षित, दीपक देशमाने, रोहन भोसले, जितेंद्र शिंगटे, जितेंद्र गायकवाड यांच्यासह असंख्य युवक सहभागी झाले होते.शूरवीरासाठी कडक पावले उचलाशहीद तुकाराम ओंबळे यांच्या तालुक्यातील या अधिकाऱ्याने देशासाठी कित्येक वर्षे आपली सेवा देऊन निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. या शूरवीरासाठी सरकारने कडक पावले उचलून त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सोडवून आणावे, अशी मागणी यावेळी उपस्थित युवकांनी केली.