मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वाक्युद्धाचे निमित्त ठरलेला रियाज भाटी याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा, दाऊद आणि त्यानिमित्ताने सुरू झालेल्या वादाशी माझा कसलाच संबंध नाही. मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यानिमित्ताने आशिष शेलारांशी संबंध येतो, तसेच शरद पवारांशीही भेट होते. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा खुलासा भाटी यांनी केला आहे. दाऊदचा हस्तक असणाऱ्या रियाजचे भाजपा नेत्यांशी जवळकीचे संबंध असल्याचा आरोप करत नवाब मलिक यांनी रियाजवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी केली होती. या आरोपानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रियाजने मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. मी दाऊदचा माणूस असतो तर मला पोलीस संरक्षण कसे मिळाले असते, गँगस्टरशी संबंध असणारा मुंबईत राहूच कसा शकेल, असा प्रश्नही उपस्थित केला.रियाज भाटी प्रकरण गुन्हे शाखेकडेभाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी रियाज भाटी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. याबाबतचा लेखी तक्रार अर्ज पोलिसांकडे देण्यात आला आहे. हा अर्ज पुढे तपासणीसाठी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करणार असल्याचे पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
By admin | Updated: October 22, 2016 03:14 IST