शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नवोदयच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ प्रकरणातील दोन्ही शिक्षकांना अटक

By admin | Updated: April 4, 2015 02:05 IST

गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपीं शिक्षक होते कुटुंबियांसह फरार.

अकोला - बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी उशिरा रात्री नागपुरातून अटक केली. १ एप्रिल रोजी गुन्हे दाखल झाल्यापासून ते कुटुंबियांसह फरार होते. जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत बोलणे, त्यांना बळजबरी अलिंगन देणे असे प्रकार येथील शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके हे करीत होते. विद्यार्थिनींनी या प्रकाराला विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत, विद्यालयातून काढून टाकू, अशा धमक्या त्यांना दिल्या जायच्या. शैक्षणिक नुकसानाच्या भीतीने विद्यार्थिनींनी हा छळ सहन केला. दरम्यान, एका विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार २१ मार्च रोजी विद्यालयाचे प्राचार्य आर. सिंह यांच्याकडे केली होती. त्यानंतर १0 दिवसांनी, म्हणजेच १ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार प्राचार्य सिंह यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली. याशिवाय २३ पालकांना सोबत घेऊन राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनीही या प्रकरणाची तक्रार त्याच दिवशी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सिव्हिल लाइन्स पोलिसांनी राजन बी. गजभिये आणि शैलेश एस. रामटेके या दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम ३५४ अ आणि पॉस्को अँक्टच्या कलम ७, ८ (लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २0१२) नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर, दोन्ही आरोपी कुटुंबियांसह फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथकं पाठवली होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यापैकी एका पथकाने दोन्ही आरोपींना नागपुरातून अटक केल्याची माहिती अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली. या दोन्ही शिक्षकांवर पुणे येथील उपायुक्त एस. एस. दिवाकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.