शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या ट्रॅफिकजामवर जलवाहतुकीचा तोडगा

By admin | Updated: August 10, 2016 04:41 IST

भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीभारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल. मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जलमार्गे प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले. मुंबईच्या सी फ्रंटवर सहा मजली टर्मिनल उभारण्यात येत आहे. मांडवाजवळ समुद्रात दोन धक्के बांधण्याचे आदेश देण्यात आले असून, डिमेलो रोडवर उंच पूल उभारणीचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहकार्याने हे काम सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. मुंबई-ठाणे जलमार्ग विकसित करण्यासाठी अनेक मागण्या मंजूर करण्यासह ठाण्याला ३०० कोटी रुपयेही देण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले. मजीद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि मेसर्स मारुती सुझुकी इंडिया लि. यांच्यात कारचे ताफे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एकवर वाराणसीहून कोलकाता येथे पाठविण्याबाबत करार झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी याला प्रारंभ होईल आणि नंतर ही वाहतूक पूर्वोत्तरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. रेल्वेचे प्रतिटन भाडे १.४१ रुपये, रस्ता मार्गावरील मालवाहतुकीचे भाडे २.५८ रुपये प्रतिटन आहे. तथापि, जलमार्गे वाहतुकीचा प्रतिटन केवळ १.०६ रुपये खर्च येतो. याशिवाय एक लिटर इंधनाद्वारे एक टन माल रस्तामार्गे २४ कि.मी.पर्यंत, रेल्वेद्वारे ९५ कि.मी., तर जलमार्गे २१५ कि.मी.पर्यंत पोहोचवता येतो, असे ते म्हणाले. देशात असे १११ जलमार्ग विकसित करण्यात आले असून, यात १६२० कि. मी.च्या गंगा जलमार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सांगितले. जल वाहतुकीसाठी पाच मल्टीमॉडल हब आणि २० वॉटर पोर्टस् बनविण्यात येत असून, ४००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.