शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नवी मुंबईवर नाईकांचाच झेंडा

By admin | Updated: April 24, 2015 02:21 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

नवी मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाईकांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने १११पैकी ५२ जागा जिंकून अपक्षांच्या मदतीने सत्तासोपानाचा मार्ग सोपा केला. सत्तासोपान गाठण्यासाठी नाईकांनी काँगे्रससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे बंडखोरांना गृहीत न धरणे शिवसेना-भाजपा युतीला महागात पडले आणि नाईकांची सत्ता घालवण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. निवडणुकीत ६८ जागा लढणाऱ्या शिवसेनेस ३८ तर ४३ जागा लढणाऱ्या भाजपास अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. काँगे्रस १० जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर राहिली. अपक्षांनी ५ जागा जिंकल्या आहेत. यात राष्ट्रवादी पुरस्कृत सुधाकर सोनवणे आणि रंजना सोनवणे हे दाम्पत्य, कोपरखैरणेतील सायली नारायण शिंदे आणि श्रद्धा गवस हे राष्ट्रवादी बंडखोर आणि शिवसेना बंडखोर सीमा गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांनी बंडखोरांना गृहीत न धरल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.