शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची छाप

By admin | Updated: May 5, 2017 04:17 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. २००२, २००३ व २००५ असे तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ३३९८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे १९३५ घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी ६९ सामुदायिक शौचालये उभारून ७१९ सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी ३६९ सामुदायिक शौचालये व १३७ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये ५५६७ सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये ९३ सामुदायिक शौचालये, २० ई टॉयलेट्स व महिलांसाठी ६ स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये ५३, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे ३१२ अशी एकूण ३६५ वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत २०१५-१६मध्ये ६५ स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व ३ लाख २५ हजार ५५ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. २०१६ - १७ या वर्षामध्ये १७० विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ७८१ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक अ‍ॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील १० रस्ते तयार झाले. कचराकुंडीमुक्त शहरासाठी ७००पैकी २०० ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)देशातील आदर्श प्रकल्प स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वांत आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, देशातील सर्वांत अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली.नवी मुंबईला मिळालेला हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका हा पुरस्कार नवी मुुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून, भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई