शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले नवी मुंबईकर

By admin | Updated: April 18, 2016 01:37 IST

दुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुबंईदुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने लातूर जिल्ह्यातील एक गाव आणि बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्यातील प्राण्यांना स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.नोकरी-व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांनी चार वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले जातात. भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत मराठवाड्यातील आपल्या बांधवांना जमेल तेवढी मदत करण्याचे संस्थेने ठरविले. संस्थेचे डॉ. व्यंकट आलाट, प्रा. ज्ञानोबा घार, प्रवीण मुक्कावार, अभिजित मळगे, सुरेश गुडपे, गोविंद बिरादार व विनोद चेडे आदींनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली. या विधायक कामासाठी लोकांकडून निधी संकलित करण्याऐवजी संस्थेकडे जमा असलेल्या निधीचा विनियोग करण्याचे ठरले. त्यानुसार जमा असलेल्या रकमेतून नाम संस्थेला ५१ हजारांचा दुष्काळ निधी देण्यात आला. त्यानंतर उर्वरित रकमेतून लातूर जिल्ह्यातील चांडेश्वेवर या गावाला १ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच आणखी दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोज सोमवंशी यांनी सांगितले. दुष्काळाची सर्वाधिक झळ लातूर जिल्ह्याला बसली आहे. येथील लोकांना घोटभर पाण्याच्या शोधात मैलाची पायपीट करावी लागत आहे. मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. चारा व पाण्याअभावी अनेक प्राण्यांनी माना टाकल्या आहेत. या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लातूरकरांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मयूर अभयारण्यातील प्राण्यांनाही दिलासाबीड जिल्ह्यातील नायगाव येथे ३००० हेक्टरवर मयूर अभयारण्यात मोर, कोल्हे, लांडगा, रानमांजर, हरीण, काळवीट आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परंतु दुष्काळामुळे पाण्याअभावी या प्राण्यांचेही हाल सुरू आहेत. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने नायगावचे प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांच्या सहकार्याने कोरड पडलेल्या मयूर अभयारण्यातील पाणवठ्यांना संस्थेने पाणी उपलब्ध करून दिले आहे.