शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई लवकरच होणार सिडकोमुक्त

By admin | Updated: March 21, 2017 03:36 IST

औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईही लवकरच सिडकोमुक्त होणार आहे.

नवी मुंबई : औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईही लवकरच सिडकोमुक्त होणार आहे. शहरातील संपादित जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भातील अंतिम मसुदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत मसुदा तयार करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. शहराच्या उभारणीसाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील जमिनी संपादित केल्या आहेत. त्या विविध वापरासाठी साठ वर्षांच्या लिजवर दिल्या आहेत. पुढील काही वर्षात यातील अनेक भूखंडांचा लिज करार संपुष्टात येईल. त्यानंतर काय, असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. जमिनी भाडेपट्ट्यावर असल्याने त्यावरील मालमत्ता हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईतील जमिनी फ्रीहोल्ड कराव्यात, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे विविध स्तरावर त्याचा पाठपुरावा करीत आहेत. विधानसभेतही त्यांनी अनेकदा हा प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सोमवारी शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी आ. म्हात्रे यांच्यासह गृहनिर्माण सोसायट्यांचे जवळपास सातशे पदाधिकारी उपस्थित होते. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना सिडकोने भाडेकराराने भूखंड दिलेत. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप केले आहे. परंतु कायदेशीरदृष्ट्या त्याची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे सिडकोने संपादित जमिनी फ्री होल्ड कराव्यात, अशी मागणी आ. म्हात्रे यांनी बैठकीत केली. तर जमिनी फ्री होल्ड करण्यासंदर्भातील मसुदा दोन महिन्यांत तयार करून राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाईल, अशी ग्वाही यावेळी गगराणी यांनी दिली. त्यामुळे नवी मुंबई लवकरच सिडकोमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी आयोजित या बैठकीला सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक फय्याज खान उपस्थित होते. (प्रतिनिधी)