शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, सिंधुदुर्ग, शिर्डीला ग्रीनफिल्ड विमानतळांचा दर्जा; देशातील २१ विमानतळांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 08:36 IST

२१ विमानतळांपैकी काहींची उभारणी सुरू आहे, तर काही प्रवासी सेवेसाठी खुली केली आहेत.

मुंबई : देशातील २१ विमानतळांना ग्रीनफिल्ड विमानतळाचा दर्जा देण्यास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डी विमानतळांचा समावेश आहे. या २१ विमानतळांपैकी काहींची उभारणी सुरू आहे, तर काही प्रवासी सेवेसाठी खुली केली आहेत.महाराष्ट्रातील तीन विमानतळांसह गोव्यातील मोपा, कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, मध्यप्रदेशातील डबरा (ग्वाल्हेर), उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार (नोएडा), गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्रप्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी (इटानगर) आदी विमानतळांचा या यादीत समावेश आहे. यापैकी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग, केरळमधील कन्नूर, सिक्कीममधील पाकयोंग, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्रप्रदेशमधील ओरवाकल (कुर्नूल) आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळ कार्यान्वित आहेत.तर ग्रीनफिल्ड विमानतळांचा दर्जा मिळालेल्या नवी मुंबई विमानतळाची रचना कमळाच्या आकारात केली जाणार आहे. ब्रिटिश वास्तूरचनाकार कंपनी झहा हदीदने त्याची डिझाईन तयार केली आहे. या विमानतळामध्ये एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असतील. ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे काय?पर्यावरणाशी संबंधित बाबींवर बारकाईने लक्ष देऊन ग्रीनफिल्ड विमानतळाचे बांधकाम केले जाते.अशाप्रकारच्या विमानतळाच्या उभारणीदरम्यान पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, याची खबरदारी घेतली जाते.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदार तत्त्वावर ग्रीनफिल्ड विमानतळांचे काम हाती घेतले जाते.दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम एअरपोर्ट हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ होय.१९ सप्टेंबर २०१३ रोजी तो प्रवासी वाहतुकीस खुला करण्यात आला.