शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट पुन्हा हॅक

By admin | Updated: July 15, 2017 04:21 IST

नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ महिन्यात दुसऱ्यांदा हॅक झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ महिन्यात दुसऱ्यांदा हॅक झाले आहे. तुर्की येथील हॅकर्सने ही वेबसाईट हॅक केली असून त्यावर तुर्की भाषेत संदेश प्रसारित केला आहे. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई पोलिसांपुढे तुर्कीच्या हॅकर्सचे आव्हान निर्माण झाले आहे.जेएनपीटी येथील संगणकांवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर सायबर हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यातील हॅकर्स एकच असावेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ १ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रथम हॅक झाले होते. मात्र ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी वेबसाईट हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त केली होती. यानंतर त्यातील डेटा सुरक्षित असून संकेतस्थळ पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केल्याचा दावा केला होता. परंतु यानंतर अवघ्या १४ दिवसांत पुन्हा नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करून हॅकर्सनी पोलिसांच्या तंत्रज्ञानापुढे आव्हान निर्माण केले आहे. शुक्रवारी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास प्रथम वेबसाईट हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर तुर्कीचा झेंडा झळकवून तुर्की भाषेत संदेश प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नवी मुंबई पोलीस खडबडून जागे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबई सायबर शाखेने जीओचा डेटा चोरणाऱ्या हॅकर्सला जयपूर येथून अटक केली आहे. यावरून सायबर सेलच्या कार्याचे कौतुक होत असतानाच त्यांच्यापुढे तुर्कीचे हॅकर्स डोकेदुखी ठरू लागले आहेत.