शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : वृद्धाचा खून करणा-या आरोपीला जन्मठेप, पाच वर्षांपूर्वी पैशासाठी झाली होती हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:30 IST

नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.

ठाणे : नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.महापे येथील हनुमाननगरात राहणारे अ‍ॅड. बलराज वाघमारे हे नवी मुंबई न्यायालयात वकिली करतात. त्यांचे वडील भीमराव वाघमारे (६२) हे महापे येथील एमआयडीसीतील केम बॉण्ड केमिकल्स लिमिटेडमध्ये माळी काम करायचे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० ही त्यांची नोकरीची वेळ होती. ११ मे २०१२ रोजी भीमराव वाघमारे नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये कामाला गेले. वाटेत मार्कवन कंपनीजवळ त्यांना आरोपींनी अडवले. त्यांच्याजवळील मोबाइल फोन, दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि मनगटी घड्याळ घेऊन धारदार शस्त्रांनी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अ‍ॅड. बलराज वाघमारे हे वाशी-सीबीडी न्यायालयात असताना तुर्भे पोलिसांनी मोबाइल फोनवर संपर्क साधून त्यांच्या वडिलांच्या खुनाची माहिती दिली. अ‍ॅड. वाघमारे हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृतदेह मार्कवन कंपनीजवळ आढळला. त्यांच्या छातीजवळ आणि कमरेवर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या ७ खुणा होत्या.तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी भादंविचे कलम ३९७ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. डोंबिवली येथील अंकुश संजय मेढेकर (२२) आणि सुधीर वसंत शेलार (२२), कल्याण येथील प्रीतेश प्रल्हाद मोरे (२५), तसेच तुर्भे येथील राजू प्रल्हाद पोळ (३०) याच्यासह दिवा येथील एका बाल गुन्हेगारास पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांतच अटक केली. तेव्हापासून खटल्याचा निकाल लागेपर्यंत ते तुरुंगातच होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी १२ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार शेवटपर्यंत त्यांच्या साक्षीवर कायम होते.उर्वरित आरोपी दोषमुक्त -भीमराव वाघमारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, त्यांचा मोबाइल फोन आदी साहित्य पोलिसांनी आरोपींजवळून हस्तगत केले. ते आरोपींजवळ कसे आले, हा प्रश्न आरोपींकडून शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. साक्षीदारांचे जबाब व पुरावे ग्राह्य धरून न्या. ए.एस. भैसारे यांनी शुक्रवारी अंकुश मेढेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले.

टॅग्स :MurderखूनNavi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालय