अरविंद म्हात्रे, चिकणघरहौसेला मोल नसते, असे म्हणतात. भिवंडीतील एका नवरदेवाने याचीच प्रचिती दिली. आपल्या विवाह सोहळ््याला गाडीतून वा घोड्यावर स्वार होऊन येण्याऐवजी तो चक्क हेलिकॉप्टरने आला. भिवंडीतील या वराने कल्याणमध्ये हेलिकॉप्टर उतरवले, ते केवळ आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी.टावरीपाड्यातील शिवा केणे यांची मुलगी नयनाचा विवाह टोळकुंदे गावच्या अमोल वाकडे यांच्याशी २१ फेब्रुवारीला झाला. मुलगा सुनेला आणण्यासाठी हेलिकॉप्टरमधून जावा, अशी अमोलच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच त्याने हेलिकॉप्टरने जाण्याचा घाट घातला. या प्रवासासाठी त्याने चक्क ३ लाख रुपये भाडे मोजल्याची चर्चा वऱ्हाडी मंडळींमध्ये रंगली होती. काहींना याचे कौतुक वाटत होते, तर काहीजण टीका करत होते. अमोल हा शेतकरी कुटुंबातला असून त्यांची स्वत:ची मोठी जमीन आहे.
नवरदेव आला हेलिकॉप्टरमधून
By admin | Updated: February 23, 2015 02:54 IST